रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जून 2018 (17:24 IST)

माझा शहरासाठी उपयोग करून घ्या – आयुक्त तुकाराम मुंढे

इथे आहे तोवर माझा उपयोग करून घ्या आपण शहर योग्य पद्धतीने सुधारित करू. पुणे येतील नागरिक आता मी नाही म्हटल्यावर मुंढेच चांगले होते असे म्हणत आहेत. त्यामुळे माझ्याकडून कामे करवून घ्या असे नाशिकचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सार्वजनी कार्यक्रमात स्पष्ट केले.सोबत न्यायालयातील माफिनाम, पळून परत आलेले अभियंते, कामाचा ताण सोबत अनेक अनेक खुलासे करत त्यांनी गौप्यस्फोट केले आहेत. प. सा. नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेच्या ५४वे पुष्प गुंफतांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी"महानगर प्रशासन, शासन व नागरिक" या विषयावर नागरिकांशी मुक्त संवाद साधला. तुकाराम मुंढे अनेक ठिकाणी अधिकारी म्हणून जातात आणि मोठे वाद निर्माण होतात. त्यामुळे ते संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत.
 
मुंढे पुढे म्हणाले की “मी लॉन्स वर कारवाई केली म्हणून नागरिकांवर पडणाऱ्या आर्थिक बोज्यावर चर्चा करता, हिशेब मांडता मग टेंडर काढताना आजवर झालेल्या भ्रष्टाचारावर का नाही बोलत? असा प्रश्न विचारून नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुख्य माध्यमांना थेट धारेवर धरले होते.
 
अनेक निविदा 40% अधिक दराने काढल्या जातात होत्या. त्या योग्य दरात देउन कामे दिली गेल्याने मनपाचे पैसे वाचले आहेत याबद्दल मात्र चर्चा होत नाही. मी कर भरतो म्हणून मला काय मिळाले हे विचारणे चुकीचे असून सजग आणि विवेकी माणसेच शहराच्या शाश्वत विकासाचा विचार करतील, असेही मुंढे म्हणाले आहेत. त्यांनी विवध प्रश्नांना उत्तरे दिली.