मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नऊवारी साडीत तब्बल 13 हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंग

new record
पुण्याच्या शीतल महाजन यांनी  नऊवारी साडीत तब्बल 13 हजार फुटांवरुन एका महिलेने उडी मारली आहे. थायलंडमधील स्काय डायव्हिंग सेंटरमध्ये 13 हजार फुटांवरुन नऊवारी साडी नेसून शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग केलं. शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळामध्ये आतापर्यत 17 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रमही रचले आहेत.
 
मराठी संस्कृतीचं जतन व्हावं आणि मराठी बाणा कायम रहावा यासाठी त्यांनी ही अनोखी कामगिरी केली. महाराष्ट्राची संस्कृती असलेला नऊवारी साडीचा पेहराव करुन पहिल्यांदाच त्यांनी विमानातून जम्प केली. जगामध्ये आजवर कोणीच साडी नेसून स्काय डायव्हिंग करण्याचा धाडसी प्रयत्न केला नसल्याचं त्या म्हणाल्या.