रविवार, 5 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (13:17 IST)

सातरा पुणे हायवेवर भीषण अपघात, कात्रजजवळ 8 वाहने एकमेकांना आदळले

पुणे सातारा पुणे हायवेवर कात्रज आंबेगांवमध्ये सकाळी 8 वाहने एकमेकांना आदळले. या अपघातात 2 लोकं जखमी झाले आहे. फायर बिग्रेडच्या जवानांनी क्रेनच्या मदतीने वाहनांना रस्त्याच्या बाजू करून ट्रफिक सामान्य केले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3च्या सुमारास एका कार चालक पुण्याकडून बेंगलोर मार्गाने जात होता. यावेळी स्वामी नारायण मंदिराजवळ अचानक समोर कार आल्याने त्याने ब्रेक लावले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रक त्याल जाऊन आदळला. नंतर एक कंटेनर आणि ट्रक एकमेकावर आदळले. असे चार वाहने एकमेकावर आदळले. यात महिंद्र आणि टक्र चालक गंभीररित्या जखमी झाले आहे. 
 
तर दुसरा अपघात मंदिराच्या पुढे 200 मीटर अंतरावर झाला आहे. यात एका टक्रने दुसर्या ट्रकला उडवले. यात बसवराज बस्वअप्पा वय 24 हा जखमी झाला आहे. चंद्रगी हा भरधाव वेगात जात असताना त्याने पाठीमागून दुसर्या् टक्रला उडवले. यात तो जखमी झाल आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिेष्ठ निरीक्षक  देविदास घेवारे, उपनिरीक्षक खेडकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.