पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पादचारी पूल होणार
पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर एकूण चार ठिकाणी पादचारी पूल बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रस्ते,परिवहन,वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मडकी वस्ती,सोलापूर विद्यापीठ,लोंढे वस्ती जिल्हा परिषद शाळा आणि भिमानगर (उजनी ) आशा चार ठिकाणी पादचारी पूल होणार आहेत. सोलापूर - पुणे या रस्त्याच्याया चौपदरीकरणामुळे सोलापूरच्या विकासाला गती मिळाली आहे.पूर्वी सोलापुरातून पुण्याला आणि पुण्याहून सोलापूरला येण्यासाठी जवळपास सहा ते साडेसहा तासांचा वेळ लागत होता.मात्र चार पदरी रस्ते झाल्यामुळे हे अंतर केवळ साडेतीन ते चार तासांवर आले आहे.