1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 27 जानेवारी 2021 (16:02 IST)

कोल्हापूर- तिरुपती मार्गावर आजपासून रेल्वेसेवा सुरू

कोल्हापूर- तिरुपती मार्गावर बुधवारपासून रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस एक फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यापाठोपाठ बुधवारपासून कोल्हापूर- तिरुपती मार्गावर विशेष रेल्वे सुरू होणार आहे. त्याचे बुकिंग येत्या चार दिवसांत सुरू होईल, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे २६ मार्चपासून सर्व रेल्वे सेवा बंद होती. टप्प्याटप्प्याने आता या सर्व गाड्या सुरू केल्या जात आहेत. कोयना आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस नंतर महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्स्प्रेस सुरू होत आहे.