1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (16:02 IST)

मोड आलेले मुगाचे बिरडं

mugache birde recipe in marathi
आपण नेहमी कडधान्यं कश्या न कश्या स्वरूपात घेत असतो. कडधान्यं हे आरोग्यास फायदेशीर असतं. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत अश्याच एका कडधान्याची सोपी रेसिपी आपण नक्की करून बघा.
 
साहित्य - 
1 1/2 वाटी मूग, 4 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या, ओलं नारळ खवलेले, 2 चमचे गरम मसाला, 2 कोकमी आमसूल, 2 कांदे बारीक चिरलेले, 1 लहान चमचा हळद, 2- 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, तेल आणि मीठ चवीप्रमाणे.
 
कृती - 
सर्वप्रथम मूग भिजवून त्याला मोड आणा, त्याचे साल आपली इच्छा असल्यास काढून घ्या. या मध्ये हळद, लसूण, मीठ आणि गरम मसाला घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. कढईत तेल घाला. त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, कांदा घालून चांगले परतून घ्या. कांदा शिजत आला की मूग घालावे, थोडं पाणी घालून शिजत ठेवावं. शिजत आले की त्यात खवलेलं ओलं नारळ, आमसूल घालावं. आता झाकण लावून शिजत ठेवावं. शिजल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गरम गरम मोड आलेल्या मुगाचं बिरडं खाण्यासाठी तयार.