1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (08:27 IST)

खुशखबर : कोकण रेल्वेच्या गाड्या वाढल्या

dadar sawantwadi
कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. आता पुन्हा दादर - सावंतवाडी ही तुतारी एक्स्प्रेस विशेष गाडी सोडण्याची निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी २६ सप्टेंबर २०२० पासून चालविण्यात येणार आहे. आतापासून आरक्षण करता येणार आहे.
 
दादर - सावंतवाडी रोड - दादर तुतारी एक्सप्रेस स्पेशल ट्रेन क्रमांक ०१००३/०१००४ ही गाडी पावसाळी वेळापत्रकानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. त्यानंतर म्हणजे १ नोव्हेंबर २०२० पासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.
 
रेल्वे क्रमांक ०१००३ दादर - सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस विशेष दादरहून २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री १२.०५ वाजता सुटेल. त्याच दिवशी गाडी सावंतवाडी रोडला दुपारी १२:२० वाजता पोहोचेल.
 
रेल्वे क्रमांक ०१००४ सावंतवाडी रोड - दादर तुतारी एक्सप्रेस स्पेशल सावंतवाडी रोड येथून २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल. ही गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी ६.४५ वाजता दादरला पोहोचेल.
 
नियमित वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबर २०२० पासून रेल्वे क्रमांक ०१००३ दादर - सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस विशेष दादर येथून रात्री १२.०५ वाजता सुटेल. त्याच दिवशी सकाळी १०.४० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
 
रेल्वे क्रमांक ०१००४ सावंतवाडी रोड - दादर तुतारी एक्सप्रेस स्पेशल सावंतवाडी रोड येथून १ नोव्हेंबर २०२० पासून संध्याकाळी ७.१० वाजता सुटेल. ही गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी ६.४५ वाजता दादरला पोहोचेल.
 
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर ही गाडी थांबेल.