गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (12:25 IST)

Rain Update: पावसामुळे 3 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती; अमरावतीमध्ये घर कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू

chiplun rain
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांत नद्यांना पूर आला असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील खुब गावात आज सकाळी एका घराची भिंत कोसळली. या भिंतीखाली 5 जण अडकले होते, त्यापैकी 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. 3 जणांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे.
 
 चंदा वराडे आणि पायल वराडे या आई आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या गावाचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. त्याचवेळी राज्यात 1 जूनपासून पाऊस आणि पुरामुळे 105 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने सोमवारी ही माहिती दिली.
 
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने एका अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बहुतांश भागात सामान्य पाऊस पडत आहे, परंतु रत्नागिरी, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.  मुंबईत सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला नसला तरी ढगाळ वातावरण कायम होते.
 
राज्यात 1 जून ते 17 जुलै दरम्यान पूर, वीज पडणे, दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, इमारत कोसळणे या घटनांमध्ये आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासांत इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.