सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जुलै 2019 (09:22 IST)

पाऊस येणार, स्कायमेटचा अंदाज

शुक्रवार, १९ जुलै अर्पाथात आजपासून मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सक्रिय होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सदरचा अंदाज खरा ठरला तर विदर्भासह मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
 
स्कायमेटकडील माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण आणि गोवा येथे पावसात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: मुंबईसह उत्तर कोकण आणि गोव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी पाऊस पडत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा वगळता पुढील २४ तासांत महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कमी राहील. १९ जुलैदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीपासून सरकणाऱ्या चक्रवाती प्रणालीमुळे हा पाऊस पडेल. २१ आणि २२ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होईल.