बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:07 IST)

महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन,ऑरेंज अलर्ट जारी

गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.त्या मुळे नागरिकांना उकाड्यापासून चांगले वाटतं असून शेतकरी बांधवाना दिलासा मिळाला आहे.
 
तर हवामान खात्याने कोकणात आणि पश्चिमी महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसाची चातका प्रमाणेच शेतकरी बांधव देखील आतुरतेने वाट बघत होते.   
पावसाच्या आगमनानंतर रायगड जिल्ह्यात शेतीच्या कार्याला सुरुवात झाली आहे.पाणी चांगले आल्याने भाताच्या लागवडीच्या कामाला देखील वेग आला आहे.त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात आहे.
 
राज्यातील नासिक शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे आगमन झाल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे.पावसामुळे शहरातील काही भागात रस्त्यावर तुडुंब पाणी साचल्याने वाहतुकीत खोळंबा होत आहे. वाहतूक ठप्प झाली आहे.
 
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात पावसाचे दमदार आगमन झाले मुसळधार पावसामुळे फाल्गुनी नदीला पूर आला त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.नागपूर मध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी करून विनाकारण घरातून बाहेर पडण्यास नाही सांगितले आहे.