विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून
महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार 7 सप्टेंबरपासून बोलविण्यात येण्याची शिफारस राज्यपालांना करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
यापूर्वी 3 ऑगस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने हे अधिवेशन 7 सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.