बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 जुलै 2020 (19:33 IST)

पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी झाला

कोरोना व्हायरसच्या संकटात शालेय अभ्यासक्रम कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याला शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. 
 
कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून राज्यातल्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं, पण यावर्षी नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरू न करता आल्यामुळे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
 
या समस्या लक्षात घेऊनन सीबीएसईनेदेखील अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे राज्य शासनानेही राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करायला मान्यता दिली आहे. 
 
कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, तसंच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती होण्यासाठी आवश्यक ती प्रसिद्धी द्यावी, असं शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.