1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (15:51 IST)

नाणार प्रकल्पाबाबत मांडलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा, राज यांचा दावा

Raj claims
नाणार प्रकल्पाबाबत मांडलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा आहे असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. नाणार प्रकल्प हातचा जाता कामा नये ही भूमिका मांडणारं पत्र राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांनाही पाठवलं आहे. शरद पवारांनी आपल्याला फोन करून भूमिका योग्य असल्याचं म्हटलंय असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
 
दुसरीकडे राज ठाकरेंच्या नाणारच्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वागत केलं आहे. 'राज ठाकरेंनी योग्य भूमिका घेतली असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. नाणारमुळे कोकणचा विकास होणार आहे असं फडणवीस म्हणाले. नाणार प्रकल्प हा राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी हा प्रकल्प व्हायलाच हवा असं फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय की,' मुख्यमंत्र्यांनीही काकोडकर यांच्याशी चर्चा करावी असं फडणवीस म्हणाले.