शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:46 IST)

चांगल्या गोष्टींसाठी बदल आवश्यक : राज ठाकरे

“औरंगाबादचं संभाजीनगर झालं तर हरकत काय? चांगल्या गोष्टींसाठी बदल आवश्यक असतात. अनेक लोकांनी अनेक गोष्टींमध्ये बदल केले. अनेक लोक आपल्या भूमिका सोडून सत्तेत आले”, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला लगावला. राज ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला.
 
“मी कुठलीही भूमिका बदलली नाही. पाकिस्तानी कलावंताना हाकलून देण्याचं काम आम्ही केलं. जे स्वत:ला हिंदू म्हणून घेतात त्यांनी हाकललं का? रझा अकादमीविरोधात मोर्चा कोणी काढला? झेंडा बदलला म्हणून भूमिका बदलली असं होत नाही. ज्या प्रकारची कृती आवश्यक आहे ती कृती फक्त माझ्याच पक्षाकडून झाली. तेव्हा बाकीचे पक्ष कुठे गेले होते?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.