शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (07:47 IST)

कोण कोण आत जातील याची कल्पना न केलेली बरी : राज ठाकरे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॅाम्बनंतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांविरुध्द आघाडी उघडली आहे. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची कसून चौकशी केंद्र सरकारने करावी, त्यांनी हस्तक्षेप करावा असे सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर फटाक्याची माळ लागेल. कोण कोण आत जातील याची कल्पना न केलेली बरं, कल्पनेच्या बाहेरचे चेहरे येतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणीसुध्दा केली.
 
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मूळ प्रश्न अंबानींच्या घराखाली गाडी लावण्याचा आहे. त्याला बगल देता कामा नये. जिलेटीन कोठून आले. पत्राचा मजकूर हा गुजराथी माणूस जसा बोलतो तसा आहे. याचा शोधही घेतला पाहिजे. यावेळी त्यांनी वाजे हा मुख्यमंत्री यांचा जवळचा माणूस असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे त्यांनी मुकेश अंबानी व उध्दव ठाकरे यांचे मधुर संबंध असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
 
यावेळी त्यांनी पोलिसांचा संघर्ष व वाद समोर येत आहे. आतापर्यंत बॅाम्ब अतिरेकी ठेवत होते. आता पोलीस ठेवतात. वाजे १७ वर्षे निलंबित होते, ५८ दिवस तुरुंगात होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना कोण घेऊन गेले. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
 
यावेळी त्यांनी अंबानींच्या घराखाली २४ तास गाडी उभी रहाते. त्यांच्याकडे मध्य प्रदेशची सिक्युरिटी आहे. ती कशी असे प्रश्ननही त्यांनी उपस्थित केले. अंबानींकडून पैसे मागण्याची थिअरी चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अंबानी व मुख्यमंत्र्यांचे संबंध सर्वांना माहीत असताना कोणता पोलीस धैर्य करेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पोलीस व प्रशासनावरचा  जनतेचा विश्वास उडाला असल्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ हस्तक्षेप करावा ही मागणी केली. यातील सत्य बाहेर यायला हवे असेही ते म्हणाले.