शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (16:13 IST)

एका ग्रामपंचायत निवडणुकीत रामदास आठवलेंच्या गटानं निर्भेळ यश

Ramdas Athavale's
सोलापुरमधील एका ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या गटानं निर्भेळ यश मिळवलं आहे.
 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीत त्यांचं पॅनल उतरवलं होतं. विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रिपाईंनं ही निवडणूक लढवली. गायकवाड यांनी या निवडणुकीचं अचूक नियोजन केलं होतं. घरोघरी जाऊन प्रचार करतानाच येथील मतदारांच्या समस्याही जाणून घेण्याचं काम गायकवाड यांनी केलं होतं. त्यामुळे रिपाईंचं पूर्ण पॅनल विजयी झालं आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीमधील ७ पैकी ७ जागा गायकवाड पॅनलला मिळाल्या आहेत. रिपाईंच्या या यशानं स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना बसला आहे.
 
सोलापूर जिल्ह्यातील एकूण ६५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ७ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली. त्यामुळे उर्वरीत ५८७ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडलं होतं.