रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (15:18 IST)

दोन दानवेत फरक काय तर एक देव आणि दुसरे दानव - ईश्वर बाळबुधे

जालना जिल्ह्यात अराजकता, हुकुमशाही, सामान्य जनतेत असलेली दहशत, भय संपवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहात लोकसभा, विधानसभेत आदरणीय शरद पवार साहेब, अजित दादा, राजेश भैय्या टोपे यांना ओबीसी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केले आहे. ते भोकरदन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग आढावा बैठक व मेळावा या कार्यक्रमात बोलत होते.
 
माजी आमदार चंद्रकांत दानवे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होते. यावेळी दोन दानवेत फरक काय तर एक देव आणि दुसरे दानव असे वक्तव्य बाळबुधे यांनी कुणाचेही नाव न घेता केले. आपले सामाजिक प्रश्न सोडविण्याची दानत फक्त आणि फक्त शरद पवार साहेब यांच्यातच आहे, असे ते यावेळी म्हणाले.
 
यावेळी अॅड. सचिन आवटे, निसार देशमुख, संजय काळबांडे, राजेश चव्हाण, विजय सुरासे, सुनीता सावंत, राजेश म्हस्के, नसीम पठाण, अमोल जाधव, अब्दुल कादीर, कादिर मौलाना, विशाल पोटे, आकाश राऊत, मुजीब कादरी, रघुनाथ पंडित, सचिन जामुंदे, विलास काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.