1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (15:06 IST)

Ratan Tata: रतन टाटांचा पहिला उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान केला

ratan tata
Ratan Tata Udyog Ratna Award: महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्य, क्रीडा, कला, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी दिला जातो. यंदाच्या वर्षांपासून उद्योग क्षेत्रातदेखील अलौकिक कामगिरी करणाऱ्यांचा गौरव उद्योगरत्न पुरस्कार दिला जात आहे. 

यंदाच्या वर्षी प्रथमच हा पुरस्कार दिला जात असून यंदाच्या पहिल्या वर्षाचे मानकरी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे आहे. बुधवारी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योगाचे मुख्य सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला 

आज रतन टाटा यांच्या कुलाबा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रतन टाटां यांचा  महाराष्ट्र शासनाचा 'उद्योगरत्न 'पुरस्काराने गौरव केला. 
 
 
‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप 25 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप 15 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.
 
 Edited by - Priya Dixit