Dharma Sangrah

राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी नोंदणी सुरु

Updated: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:15 IST)
 
महाराष्ट्र परीक्षा परिषेदेने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. इयत्ता १०वीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्कासह ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन विषय मिळून २०० गुणांची परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, कन्नड व तेलगू अशा सात भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mscepune.in किंवा http://nts.mscescholarshipexam.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन परिषदेने केले आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

World Ozone Day 2026: जागतिक ओझोन दिन साजरा करण्याचा इतिहास आणि महत्व जाणून घ्या

LIVE: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क, 'एक विभाग, एक पोलीस' योजना

बदलापूरमध्ये शरद पवार गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एसटीने दिलासादायक प्रवास पुरवला, एनसीएमसी कार्डची आवश्यकता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली

संचेती चौकात दुचाकीस्वाराने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला धडक दिली, एफआयआर दाखल

पुढील लेख
Show comments