मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 5 मे 2020 (08:26 IST)

केबीसी च्या १२ व्या पर्वाची घोषणा, ९ मे पासून रात्री ९ वाजल्यापासून नावनोंदणी सुरु

महानायक आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांनी १२ वं पर्व सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे. सोनी टीव्हीने ‘कौन बनेगा करोडपती’चा एक नवा प्रोमो व्हिडीओ शेअर केला असून त्यात अमिताभ बच्चन १२ व्या पर्वाची घोषणा करताना दिसून येत आहेत. त्यामुळे केबीसी २०२० मधील नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचं लक्षात येत आहे.
 
‘जिथे सगळं बंद आहे तिथे अशी एक गोष्ट आहे जी कधीच बंद होऊ शकत नाही. ते म्हणजे स्वप्न. चहापासून रेल्वे गाडीपर्यंत सगळ्याला ब्रेक लागू शकतो. पण तुमच्या स्वप्नांच्या उंच भरारीला नाही. याच स्वप्नांना उंच भरारी घेता यावी यासाठी केबीसी पुन्हा सुरु होत आहे. ९ मे पासून रात्री ९ वाजल्यापासून नव्या पर्वासाठी नावनोंदणी सुरु करण्यात येत आहे’, असं या व्हिडीओमध्ये बिग बी सांगत आहेत.