शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (17:08 IST)

नात्याला काळिमा : बापानेच केला मुलीचा खून,प्रेयसीशी सूड घेण्यासाठी निर्घृणपणे ठार मारले

असे म्हणतात,मुली आपल्या वडिलांच्या काळीजाचा एक भाग असतो.मुलींसाठी वडील काहीही करायला तत्पर असतो.वडील आणि मुलीचं नातंच काही वेगळं असत.परंतु आज या नात्याला काळिमा लावणारी घटना घडली आहे.एक वडील इतका निर्दयी देखील असू शकतो की आपल्या पोटाच्या गोळाला ठार मारेल.ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील झाशी येथे घडलीआहे झाशीच्या मौरानीपूर पोलीस स्टेशन परिसरातील धौरा गावात शुक्रवारी बबलूची 13 वर्षीय मुलगी मायाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करण्यात आली.या प्रकरणात मायाच्या वडिलांनी आठ जणांविरोधात नामांकित एफआयआर दाखल केली होती. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. तपासात पोलिसांच्या संशयाची सुई मयत मुलीच्या वडिलांकडे वळली. चौकशी दरम्यान वडिलांनी आपल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले. 
 
वडील बबलूचे गेल्या दहा वर्षांपासून एका महिलेशी प्रेमसंबंध होते. वर्षभरापूर्वी त्याने महिलेच्या भावाला तीस हजार रुपये दिले होते, जे तो परत करत नव्हता. याबाबत बबलू आणि महिलेमध्ये वाद झाला. याचा सूड घेण्यासाठी बबलूने आपल्या मुलीची हत्या केली आणि विरोधकांवर आरोप केले. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी घटनेत वापरलेली कुऱ्हाड जप्त केली.आरोपी वडिलांना अटक करण्यात आली.