1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 2 एप्रिल 2023 (12:34 IST)

नारायण राणेंना कोर्टाकडून दिलासा

rane
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्या प्रकरणी अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोषमुक्त असल्याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पुरेसे  पुरावे नसल्याने त्यांनी हा निर्णय दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण दौरा असताना  महाडच्या  एका  पत्रकर परिषदेत  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  बद्दल अवमानकारक शब्द उद्गारल्या प्रकरणात शिवसैनिक सिद्धेश पाटेकर यांनी तक्रार दाखल केल्या वरून गुन्हा दाखल करण्यात आला.पण काहीही पुरावे न सापडल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 
 
Edited by - Priya Dixit