बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2023 (11:56 IST)

बाईकवरील स्टंटबाजी पडली महागात, पोलिसात गुन्हा दाखल

सोशल मीडिया वर बऱ्याच वेळा काही लोक  प्रसिद्धीसाठी स्टंटबाजीचे असे व्हिडीओ शेअर करतात पण असे केल्यामुळे अनेक जण बळी पडतात. असाच स्टंटबाजीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे जे करणं त्यां तरूणांना चांगलंच भोवल आहे.पोलिसांनी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्सचा असून या व्हिडीओ मध्ये एक तरुण बाईक चालवत असून बाईकवर त्याच्या मागे एक मुलगी आणि एक मुलगी पुढे बसलेली असून तरुणाने वेगात असणाऱ्या बाईकचे पुढील चाक वर केले स्टंटबाजीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करण्यात आला असून व्हायरल झाला आहे. मुंबई पोलिसांनी टॅग करून सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक अन्सारी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 
 
वाहतूक नियमांना धता देत स्टंटबाजी करण्याचा हा व्हिडीओ टाकणे त्यांना चांगलंच भोवले आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.   
 
Edited by - Priya Dixit