गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:48 IST)

रेमडेसिवीर इंजेक्शनकरता अजूनही वणवण सुरु

सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधक राजकारण करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर इंजेक्शनकरता अजूनही वणवण सुरु असताना विरोधक अशात राजकारण करताना दिसत आहे. राज्यातील जास्तीत जास्त परिस्थिती कशी बिकट होईल याकडे विरोधकांचे लक्ष आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करणे तात्काळ थांबवावे”, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.
 
“सध्याच्या परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनकरता वणवण करावी लागत आहे. मात्र, आता मुंबई महापालिका पूर्णपणे प्रयत्न करत असून आता महापालिकेच्या रुग्णालयात रेमडेसिवीरचा तुटवडा होऊ देणार नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वी आपल्याला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला होता. मात्र, ज्याठिकाणी ऑक्सिजनचा साठा होता त्याठिकाणी आपण रुग्णांना पाठवले होते. मात्र, आता असे देखील दिसून येते की, बऱ्या झालेल्या रुग्णांचा अचानक ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. पण, आता मुंबई महापालिकेने बेड वाढवले आहेत. त्यामुळे आता ही देखील चिंता मिटण्याची शक्यता आहे”.