1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (15:38 IST)

दारिद्रय रेषेखालील सर्वाना मोफत लस मिळावी यासाठी प्रयत्न सुरू : टोपे

Efforts are underway
कोरोना लसीकरणाचा आज ऐतिहासिक क्षण आहे. दिली जाणारी लस मोफत दिली जात असून, लसीकरणातील शेवटच्या लाभार्थ्यांना मोफत लस मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. दारिद्र्य रेषेखालील गरजूंना मोफत लस मिळावी अशी इच्छा असून यात काही अडचण आली तर राज्य सरकार यासाठी सक्षम असल्याची ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
आरोग्य विभागासह इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामामुळे कोरोना नियंत्रणात राहिला. राज्यात आज कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, जेष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यासाठी १७.५० लाख डोस आवश्यक आहेत. आजवर ९.८० लाख डोस प्राप्त झाले आहेत. उर्वरित डोस लवकर उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.