शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 7 जून 2021 (08:39 IST)

प्रवास करण्यासाठी ई-पासची अट काढून टाकली

राज्य सरकारनं पहिल्या चार श्रेणीतल्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यासाठी ई-पासची अट काढून टाकली आहे. त्यामुळे आजपासून राज्यभरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पुन्हा धावू लागणार आहेत. 
 
मुंबईत बेस्ट उपक्रमालाही उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेनुसार फक्त बसून प्रवास करायच्या अटीवर प्रवासी वाहतूक करायला परवानगी मिळाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून अधिकाधिक बसगाड्या चालवल्या जाणार आहेत. बसमधून प्रवास करताना तोंडावर मास्क लावावा अशी सूचना बेस्ट उपक्रमान केली आहे.
 
मुंबई मेट्रो सेवेनंही प्रवाशांच्या सोयीसाठी आजपासून आपल्या दैनिक फेऱ्या वाढवायच ठरवलं असून गर्दीच्या वेळी दर १० मिनिटांनी तर इतर वेळी दर १५ मिनिटांनी ही सेवा उपलब्ध असेल.