सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 डिसेंबर 2018 (16:11 IST)

आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण करून आरक्षण द्या, ब्राह्मण समाजाची मागणी

ब्राह्मण समाजाने आरक्षणाची थेट मागणी न करता, ब्राह्मण समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थितीचं सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी केली. त्यासाठी मागासवर्ग आयोगाला भेटणार असल्याचं ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी म्हटलं आहे. ब्राह्मण समाजातील सर्वांचीच स्थिती चांगली नाही, त्यासाठी सर्वेक्षण झाल्यानंतर काही विशेष मागण्या आम्ही करु, असं आनंद दवे यांनी सांगितलं.
 
आनंद दवे म्हणाले, “आरक्षण आर्थिक निकषावर असावं, मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असू दे. जो गरीब असेल त्याला आरक्षण मिळावं. कारण प्रत्येक जाती-धर्मातील सर्वच्या सर्व गरीब नसतात, सर्वच्या सर्व श्रीमंत नसतात. जाती-धर्मावरुन आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे” असं आनंद दवे म्हणाले.
 
ब्राह्मण समाजाबद्दल गैरसमज आहे की सर्वच्या सर्व चांगल्या स्थितीत आहेत. पण तशी परिस्थिती नाही. आज महाराष्ट्रात 1 कोटी पेक्षा जास्त ब्राह्मण आहेत. मात्र त्यापैकी 70-80 लाख लोकांचं उत्पन्न हे महिन्याला 10-20 हजाराच्या दरम्यानच असेल. त्यामुळे मागासवर्ग आयोगाने ब्राह्मणांचं सर्वेक्षण करावं. त्यातून जो अहवाल येईल, त्यातून निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे.