गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 डिसेंबर 2018 (15:52 IST)

मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू

The law of Maratha reservation
मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाला  मोठे यश मिळाले. मागील काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आता आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा,' हे दिलेले आश्वासन अखेर प्रत्यक्षात आले आहे. आजपासून मराठा आरक्षणाचा कायदा राज्यभरात लागू झाला आहे.
 
मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केले आहे. मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात १६ टक्‍के आरक्षण देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्‍का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून हे आरक्षण देण्यात आले आहे. ९ जून २०१४ च्या अधिसूचनेनुसार उन्‍नत आणि प्रगत गटातील नागरिकांना हे आरक्षण मिळणार आहे.