मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (15:27 IST)

एसबीआयमध्ये खाते उघडण्यासाठी शाखेत जावे लागणार

state bank of india
एसबीआयच्या योनो ('यू ओनली नीड वन)च्या अनेक सुविधा प्रभावित झाल्या आहेत. बँकेनं गेल्या काही दिवसांपूर्वीच योनोच्या माध्यमातून कागदपत्रांशिवाय खातं उघडण्याच्या सुविधेला तात्काळ बंद केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बँकेनं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं आता यासंदर्भात आरबीआयकडे विचारणा केली आहे. बँकेनं नोव्हेंबर 2017मध्ये योनोची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती, त्यानंतर योनोच्या माध्यमातून 25 लाख लोक बँकेशी जोडले गेले. बँकेचं योनोच्या माध्यमातून ग्राहकांची संख्या 25 कोटींपर्यंत नेण्याचं लक्ष्य होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बँकेनं ही सुविधाच बंद केली आहे. याशिवाय ई-केवायसी सेवा बंद केली आहे.