सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (08:39 IST)

राज्यात फेसबुक वापरकर्त्यांपैकी ४० टक्के व्यक्ती फेसबुकवर सक्रिय

महाराष्ट्रातील एकूण फेसबुक वापरकर्त्यांपैकी ४० टक्के व्यक्ती या मराठी भाषिक फेसबुकवर सक्रिय आहेत.शहरनिहाय फेसबुकवर अ‍ॅक्टिव्ह असणा-या मराठी भाषिकांचा केलेल्या एका सर्वेक्षणानुसार औरंगाबाद हे शहर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.या शहरात फेसबुक वापरणा-या व्यक्तींची संख्या ८.१० लाख असून त्यापैकी फेसबुक वापरणा-या मराठी भाषिकांची संख्या ५.९० लाख इतकी असून त्याची टक्केवारी ७२. ८४ आहे. सामाजिक माध्यमे आणि जनसंज्ञापन या विषयाचे अभ्यासक व्यंकटेश कल्याणकर यांनी केलेल्या एका सर्वेक्षणातुन ही माहिती समोर आली आहे. 
 
संशोधनानुसार मुंबईतील एकूण फेसबुक वापरकर्त्यांच्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षाही कमी वापरकर्ते हे मराठी भाषिक आहेत. तसेच इतर चार शहरांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये मराठी भाषिकांचे फेसबुक वापरण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. पुण्यातील ४४ टक्क्यांपेक्षा अधिक फेसबुक वापरकर्ते हे अमराठी आहेत. तर मुंबईनंतर सर्वाधिक अमराठी भाषिक नागपूरमध्ये त्यापाठोपाठ पुण्यात असल्याचे दिसून आले आहे. 
 
मराठी फेसबुक वापरकर्ता हे अचुकपणे शोधून काढण्याकरिता एखाद्या फेसबुक वापरकर्त्याने आपली ओळख कुठल्या भाषेच्या माध्यमातून केली आहे, तसेच त्याने कुठल्या मराठी वृत्तपत्रांना, मराठी वेबसाईटला आपली पसंती दर्शविली आहे, फेसबुकवर कार्यरत असणा-या किती मराठी अँप्लिकेशन्स आणि पोस्टला त्याच्याकडून पसंती मिळाली आहे, हे मुद्दे विचारात घेतले गेले आहेत.