1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (09:48 IST)

कै. बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन

balasaheb thakare
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे.आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर दाखल होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांना आदरांजली वाहतील. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथं येणार आहेत. स्मृतीदिनाच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. 
 
राजकारणाला एक नवी दिशा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या आक्रमक वकृत्त्व शैलीने त्यांनी तब्बल चार दशकं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. मराठी माणसाला एक वेगळी ओळख मिळवून देण्यात बाळासाहेबांचं एक मोठं योगदान आहे.