1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (17:51 IST)

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात

महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून 3-5 ऑक्टोबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. विजेच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसेल असं सांगण्यात आले आहे. या काळात गोव्यातही पाऊस होणार आहे. तसंच शनिवारी  मुंबईत मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
 
28 सप्टेंबरपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिना सुरु झाल्याने पाऊस लवकरच आपली रजा घेईल आणि ऑक्टोबर हिटला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.