सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (08:10 IST)

राज्यात ११,९२१ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची भर

राज्यात दर दिवशी कोरोना रुग्णसंख्येत हजारोंच्या आकड्यानं भर पडत आहे. सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरात राज्यात ११,९२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 
 
नव्या रुग्णांचा आकडा पाहता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,५१,१५३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ३५१ मृत्यू आहेत. तर, १०,४९,९४७ रुग्णांना कोरोनावरील उपचारांनंतर रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. 
 
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्यात २,६५,०३३ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असली तरीही, रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही समाधानकारक आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल १९,९३२ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आलं. तर, १८० मृत्यूंची नोंद करण्यात आली.