मंगळवार, 15 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:37 IST)

राज्यात २,७२,७७५ रूग्णांवर उपचार सुरु

राज्यात शुक्रवारी राज्यात  कोरोनाचे १७,७९४ रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात १९,५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १३,००,७५७ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९,९२,८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,७२,७७५ रुग्ण उपचार घेत आहेत.
 
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही नियंत्रणात आलेली नाही. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७६.३३ % टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.६७ टक्के इतका आहे.
 
सध्या राज्यात १९,२९,५७२ जण होम क्वारंटाईन असून ३२,७४७ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत राज्यात ६१,९०,३८९ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १२,८२,९६३ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.