रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (08:38 IST)

कोरोना रुग्णांना दिलासा, राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित

राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
 
एचआरसीटी चाचणी १६पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर समितीने निश्चित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यासंदर्भात समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते.
 
कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार रुपये इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.