शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी आणि किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प - जयंत पाटील  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी व्हावी आणि भूईकोट किल्ल्याचा विकास व्हावा असा संकल्प करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
				  													
						
																							
									  
	 
	स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील भूईकोट किल्ल्याच्या विकासाबाबत आज मुंबईत बैठक पार पडली. 
				  				  
	 
	या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अतुल बेनके आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर, महाराजांची सुटका करण्यासाठी याच किल्ल्यावर प्रयत्न झाला होता हे या किल्ल्याचे महत्त्व आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही याबाबत काही सुचना केल्या.
				  																								
											
									  
	 
	जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे, महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती देणारे, शिवसंस्कार सृष्टी स्मारक बनवण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची संकल्पना आहे. याबाबतीतही यावेळी चर्चा करण्यात आली.