नाशिक: वीज कट करण्याचा खोटा एसएमएस पाठवून तब्बल पावणे सहा लाखांचा गंडा
एमएसइडीसीएल म्हणजेच वीज कंपनीच्या नावाने ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढलय..वीज कंपनीच्या नावाने एसएमएस येतो आणि त्यात तुमची वीज कट करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.आणि हे टाळण्यासाठी एका मोबाईल क्रमांकावर फोन करण्यास सांगितला जातो..
एमएसईडीसीएलमधून बोलत असल्याची सांगून थकित वीज बिल भरण्याचा बहाण्याने भामट्यांनी एकाने पावणे सहा लाख रूपयांना ऑनलाईन गंडा घातला. या फसवणूक प्रकरणी राहूल युवराज जाधव (रा.उत्तमनगर,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार जाधव यांच्या वडिलांशी गेल्या सोमवारी भामट्यांनी संपर्क साधला होता.
एमएसईडीसीएलमधून बोलत असल्याची बतावणी करीत भामट्यांनी मागील महिन्याचे वीज बिल थकित असल्याचे सांगून त्यांना क्विक सपोर्ट हे रिमोट अॅक्सेस अॅप आपल्या मोबाईलवर डाऊन लोड करण्यास भाग पाडले. हे अॅप डाऊनलोड करतांना भामट्यांनी जाधव यांच्या बँक खात्याची व मुदत ठेव पावतीची गोपनीय माहिती मिळवीत हा गंडा घातला. जाधव यांच्या बँक खात्याची गोपनीय माहितीच्या आधारे भामट्यांनी मुदत ठेव म्हणून बँकेत जमा असलेल्या ५ लाख ७५ हजार ११.२४ रूपये परस्पर अन्य ग्राहकाच्या खात्यात वळवून त्यावर डल्ला मारला. अधिक तपास निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.