बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (23:45 IST)

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करण्याऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

rupali chakarnkar
राज्य महिला आयोगाचा अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या 7 जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणं काही तरुणांना महागात पडलं आहे. या प्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणांमध्ये एक वकील देखील आहे. 
 
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नाशिकच्या सभेवेळी सुप्रिया सुळे बोलत असताना 5 जणांकडून रुपाली चाकणकरयांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला होता.
रुपाली चाकणकर यांना फेसबुक लाईव्ह करत असताना काही तरुणांनी आक्षेपार्ह कमेंट केले होते. एकूण सात जणांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट केले होते. 
 
त्यामुळे त्यांच्यावर कलम 354 ए, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit