बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

निवडणुकांनंतर सत्तेसाठी एकत्र येणार काय? खुलासा करावा- अहिर

आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देत शिवसेना युतीबाहेर पडली खरी पण राज्यात सत्तेतून बाहेर पडण्याची धमक शिवसेना नेतृत्वात नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी लगावला.

तसेच आता वेगळे लढत आहेत पण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील निवडणुकीनंतर जसे सत्तेसाठी एकत्र आले तसे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये निवडणुकीनंतर एकत्र येणार का? याचाही खुलासा शिवसेना-भाजपने करावा असे आव्हान अहिर यांनी दिले. कल्याण-डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही शिवसेना-भाजपने सत्तेसाठी युती केल्यास ती मतदारांची फसवणूक ठरेल असे मत अहिर यांनी मांडले.