सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिरडीत चमत्कार! भीतींवर भक्तांना दिसले साईबाबा

शिरडीत साई मंदिरात भीतींवर भक्तांना साईबाबा दिसल्याची अफवा पसरली आणि भक्तांची गर्दी उमटली. साईबाबा दिसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंदिरात येणार्‍या भक्तांप्रमाणे मंदिराच्या एका भीतींवर साईबाबाचे चित्र दिसून येत आहे. 
 
सूत्रांप्रमाणे बुधवारी रात्री अफवा पसरली की शिरडी मंदिर परिसरात द्वारका माई मंदिराच्या भीतींवर बाबा दिसत आहे. ही भिंत तशीही चमत्काराची भिंत म्हणून प्रसिद्ध आहे.
 
काळ्या रंगाच्या या भीतींवर अस्पष्ट सी प्रतिमा दिसण्याचा दावा केला जात आहे. या आकृतीवर फुलांचा हार चढवण्यात आला आहे. यानंतर मंदिरात दर्शन करण्याची गर्दी वाढू लागली. गर्दी असल्यामुळे मंदिर रात्रभर उघडे ठेवले गेले. सतत गर्दीमुळे दोन दिवसापासून मंदिर उघडेच ठेवण्यात आले होते.