शुक्रवार, 23 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

साई बाबांच्या दर्शनासाठी 'टाईम दर्शन'ची सुविधा

शिर्डी साई बाबांच्या दर्शनासाठी 'टाईम दर्शन'ची सुविधा
शिर्डीतल्या साई बाबांच्या दर्शनासाठी आता तिरुपतीच्या धर्तीवर टाईम दर्शन सुविधा सुरू करण्यात आली असल्याची घोषणा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी केली़ आहे. टाईम दर्शनमुळे सामान्य भाविकालाही व्हीआयपी बनवण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे. यासाठी संस्थानच्या जुन्या प्रसादालय परिसरात दहा काऊंटर उघडण्यात आले आहेत.

दर्शनासाठी आलेल्या भाविकाने येथे आपली नोंदणी करायची आहे़ यात भाविकाचा फोटो, थंब इंप्रेशन, पत्ता आदीची नोंदणी होवुन त्याला एक कार्ड देण्यात येणार आहे़ त्यावर दर्शनाची वेळ दिलेली असेल़ ठराविक वेळी जावुन भाविक पंधरा मिनीटात दर्शन घेवून बाहेर पडणार आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणी बरोबरच समाधीला लावण्यात येणाऱ्या काचा हटवण्यात येणार आहेत़. यामुळे भाविक समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे.
दुसरीकडे व्हीआयपींचे सशुल्क दर्शन व आरती पासेस पुर्वी प्रमाणेच सुरू राहणार आहेत़. त्यासाठी शिफारशीची अटही या व्यवस्थापनाने काही दिवसांपुर्वी काढून टाकली आहे़.
 
काही दिवसांपूर्वी संस्थानने रांगेतील भाविकाचे गंध लावून स्वागत करण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय वृद्ध, अपंग, लहान मूल सोबत असलेल्या माता यांना थेट विनाशुल्क दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रांगेतील भाविकांना चहा,कॉफी, दूध, बि स्कीटे विनामुल्य उपलब्ध करून केली आहे.