शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (18:06 IST)

कार्तिकी एकादशीला सजली पंढरी

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 15 प्रकारच्या एकुण 5 टन फुलांचा सजावटी करिता वापर करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक पार पाडली.