शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (15:54 IST)

भाजप नेते अनिल बोंडे यांना अमरावती पोलिसांकडून अटक

अमरावती शहरात 12 व 13 नोव्हेंबरला झालेल्या तोडफोड व जाळपोळीच्या घटनेनंतर संचारबंदी लावण्यात आली. रविवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती. ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपाने जिल्हाबंदची हाक दिली होती. या बंदला प्रतिसाद मिळाला. सुरक्षेच्या कारणावरून चार तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आली तर काही भाजपाच्या नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. त्यानंतर आजभाजप नेते अनिल बोंडे यांना अमरावती पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
 
शहरात संचारबंदी लागल्यानंतरही शनिवारी रात्री पठाण चौक, हनुमान नगर, सक्करसाथ या भागामध्ये तणाव पाहायला मिळाला. त्यामुळे पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागली. तणावाची स्थिती लक्षात घेऊन शहरात नागपूर, हिंगोली, नांदेडसह अन्य जिल्ह्यातून पोलिसांची कुमक बोलविण्यात आली आहे. शहरातली स्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण आहे. शहरात विणाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांची कारवाई दिवसभर सुरू होती. प्रत्येक संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे.
 
दोषींवर कारवाई होत आहे. दोन दिवस ज्या वेगवेगळ्या अनुचित घटना घडल्या, त्या सर्व घटनांतील दोन्ही गटांच्या जबाबदार दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले. सुमारे 50 संशयितांना अटक करण्यात आली. याप्रकरणी तपास जारी असून, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शहरात शांतता व सलोखा कायम राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना केले.