मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (15:57 IST)

बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा बळी

सातारात 15 नोव्हेंबर स्लग बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा बळी.. बिबट्याची कराड तालुक्यात दहशत वाढली असून आज सकाळी धक्कादायक घटना घडली..कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्याने ऊसतोड मजुराच्या सात वर्षीय मुलास फरपटत ओढून नेत त्याचा बळी घेतला . आकाश बिगाशा पावरा असे बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
 
या घटनेमुळे कराड तालुका हादरला असून बिबट्या आता माणसांचेही बळी घेऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी तांबवे येथे 9 वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
 
आकाशचे वडील हे ऊसतोड मजूर आहेत. आज सकाळी येणके-किरपे रोडवरील शिवारात बिबट्याने आकाशवर अचानक हल्ला केला. काही कळायच्या आत बिबट्याने आकाशला फरपटत ओढत नेऊन त्याचा बळी घेतला.कराड तालुक्यात यापुर्वीही बिबट्याने शेतकरी, महिलांसह लहान मुलांवर हल्ले केले आहेत. येणके येथे घडलेल्या घटनेने बिबट्याची दहशत वाढल्याचे समोर येत आहे.