रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (21:09 IST)

मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत सांबरचा मृत्यू

accident
इगतपुरी – नाशिक-मुंबई महामार्गावरील रायगडनगर येथे ठाण्यातील एका गाडीने सांबर जातीच्या वन्य प्राण्याला धडक दिली.
या अपघातात सांबरचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी वनविभागाने ही गाडी जप्त केली आहे. याबाबत पुढील तपास वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
आज वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक प्रादेशिक यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक वनक्षेत्रातील मुंबई आग्रा रोडवर रायगडनगर येथे वाहन क्रमांक एम एच 04-जी आर 7849 हे मुंबईकडे जात असतांना सांबर (मादी) हा वन्यप्राणी अचानक येवुन वाहनासमोर धडकल्याने सांबरचा जागेवरच मृत्यू झाला.
हा सांबर अंदाजे 7 ते 8 वर्ष वयाचा असुन त्यांच्या डोक्याचा भाग वाहनास धडकल्याने त्याचा जागेवरच मृत्यु झालेला आहे. हेे वाहन वनविभागाने ताब्यात घेतले असुन मृत वन्यप्राणी सांबर याचे शवविच्छेदन करुन अग्निडाग देण्यात आलेला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor