मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (21:05 IST)

अबब, रिक्षा चालकाने थेट वाहन रेल्वे फलाटात आणली

मुंबईतील आंबिवली रेल्वे स्थानकात एका रिक्षा चालकाने थेट वाहन रेल्वे फलाटात आणल्याची घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

समाज माध्यमांवर त्या मुजोर रिक्षाचालकाबद्दल नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. स्थानकातील प्रवासी त्यास विरोध करत होते, मात्र वाहन सुरू असल्याने कोणी पुढे गेले नाही. या घटनेची रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेने देखील गंभीर दखल घेतली असून त्या चालकाचा शोध घेणे सुरू आहे. यासाठी व्हिडिओचा आधार घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने त्या घटनेत कोणाचाही अपघात झाला नाही.