शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (07:47 IST)

मुंबईकरांना आता “या”ठिकाणी गणपती मूर्ती विसर्जन स्थळाची माहिती मिळणार

mumbai mahapalika
मुंबईकरांचे गणपती विसर्जन सुरक्षित होण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आताच कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत आहे. विसर्जनाच्या दिवशी गर्दी होऊन पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ही सेवा सुरू केली आहे.
 
या व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेमार्फत मुंबईकर आता क्यूआर कोड स्कॅन करून किंवा बीएमसीने दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांच्या घराजवळील गणेश मूर्ती विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात. तसेच आता मुंबईकरांना बाप्पांच्या विसर्जनासाठी पायपीट करावी न लागता एका क्लीकवर गणेश मूर्ती विसर्जन स्थळाची माहिती मिळणार आहे.
 
बीएमसीने शहरामधील उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मोठी तयारी केली आहे. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी नागरी संस्थेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तर मुंबई महानगरपालिकेने मुंबईमधील कृत्रिम तलावांची यादी जाहीर केली आहे, जेणेकरून नागरिक तिथे आपल्या घरातील गणेश मुर्त्यांचे विसर्जन करू शकतील. दरवर्षी, नागरी संस्था मूर्ती विसर्जनासाठी तात्पुरते कृत्रिम तलाव बांधले जातात.