लालबागच्या राजाच्या चरणी तब्बल 250 तोळे सोनं आणि 29164 ग्रॅम चांदीचे दान
लालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंत भाविकांनी अपर्ण केलेल्या दानातून तब्बल 250 तोळे सोनं आणि 29164 ग्रॅम चांदी जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजा च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. लालबागचा राजाच्या चरणी भक्तांनी पाच दिवसात कोट्यवधींचं दान जमा केलं आहे. 5 दिवसांत लाखो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. 5 दिवसात अडीच कोटी रुपये इतके दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झाले आहे. यामध्ये रोख रकमेसह नाण्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी देखील भक्तांनी अर्पण केली आहे. जवळपास 250 तोळे सोन आणि 29164 ग्रॅम चांदी चांदीचे दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत अर्पण करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.