शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (07:57 IST)

एक पाऊल डिजिटल शिक्षणाकडे, बालवाड्यांच्या सक्षमीकरणावर अधिक जोर

mumbai mahapalika
मुंबई महापालिका शिक्षण विभाग पालिका शाळांमध्ये डिजिटल, आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच बालवाड्यांच्या सक्षमीकरणावर अधिक जोर देत आहे. सध्या विविध ठिकाणी पालिकेच्या ९०० बालवाड्या सुरू आहेत. मात्र आणखीन कोणत्या ठिकाणी किती बालवाड्या सुरू करून मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणायचे यासाठी जीओ मॅपिंगद्वारे ८० टक्के सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यासंदर्भातील माहिती पालिका शिक्षण विभाग सह आयुक्त अजित कुंभार यांनी दिली आहे.
 
मुंबई महापालिका शिक्षण विभाग गेल्या अनेक वर्षांपासून पालिका शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब, कॉम्प्युटर आदींच्या माध्यमातून आधुनिक व डिजिटल शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे.
 
शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी, पालक यांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांबाबतची ओढ पाहता पालिकेने काही ठिकाणी मुंबई पब्लिक स्कुल सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे पालिकेने लहान मुलांमध्ये बालपणापासूनच शिक्षणाची गोडी लागावी यासाठी बालवाड्या सुरू केल्या असून आतापर्यंत ९०० बालवाड्या सुरू केल्या आहेत.