गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (22:54 IST)

अंबरनाथ :टीव्हीच्या रिमोटवरून भांडण,सुनेने सासूचा चावा घेतला, गुन्हा दाखल

remote cell
सासू सुनेच्या भांडण होणं काही नवीन विशेष नाही, पण टीव्हीच्या रिमोटवरून झालेल्या भांडणावरून सासू सुनेचे भांडण थेट अंबरनाथ पोलीस ठाण्यात पोहोचले. रिमोटच्या भांडण्यावरूनअसे काही घडेल याची कोणीच कल्पना केली नसणार. सुनेने जे काही केलं ते आश्चर्य कारकच आहे.सुनेने रिमोटच्या भांडण्यावरून सासूला चावा घेतला. दोघीमध्ये वाद होऊन सुनेने सासूला लाथाबुक्काने बेदम मारहाण करत तिच्या हाताच्या बोटाला कडाडून चावा  घेऊन सासूचे तीन बोटाचे लचके घेतल्याची  घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील वडवली सेक्शन परिसरात असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीत घडली आहे.आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या गंगागिरी अपार्टमेंट येथे विजया कुलकर्णी (32) या आपल्या नवऱ्या आणि सासू सोबत राहतात. विजया कुलकर्णी यांची सासू वृषाली कुलकर्णी (60) सासू ने आपल्या सुनेच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. शिवाजी नगर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघी  सासू-सुनेत नेहमी भांडण आणि वाद विवाद होतात. नेहमी एकाच वेळी वेगवेगळ्या कामावरून त्यांच्यात भांडण होते. या वेळी भांडणाचे कारण रिमोट होते. रिमोटवरून किरकोळ भांडण झाले हे भांडण गणेशोत्सवाच्या दिवसापासून सुरु झाले. सासू वृषाली यांचे म्हणणे आहे की, ज्यावेळी त्या पूजा करतात त्याच वेळी त्यांची सून विजया मुद्दाम जोराने टीव्ही लावते. सोमवारी संध्याकाळी विजया संध्याकाळी देवाची प्रार्थना करून टीव्ही समोर बसली होती, तेव्हा तिच्या सासूबाई पूजा करायला बसल्या त्यांना टीव्हीच्या आवाजामुळे त्रास होऊ लागला आणि त्यांनी सुनेच्या हातातून रिमोट घेऊन टीव्ही बंद केला.सासूने बंद केलेला टीव्ही सुनेने पुन्हा ऑन केला नंतर असे दोन-तीन वेळा झाल्यावर सासूच्या हाताला सून विजयाने चावा घेतला. संतापलेल्या सुनेने हातवारे करणाऱ्या सासुला शिवीगाळ करत सासूच्या उजव्या हाताच्या तीन बोटाला सुनेने कडाडून चावा घेतला. त्यामुळे सासुला गंभीर दुखापत झाली. विजयाच्या नवऱ्याने मध्यस्थी करत त्यांचे भांडण बंद करण्याचा प्रयत्न केला तर विजया हिचे नवऱ्याशी देखील कडाक्याचे भांडण झाले. नंतर सासू वृषाली पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि त्यांनी आपल्या सुनेच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सुनेविरुद्ध चावण्याचा आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे.